समाजकार्यासाठी कर्तृत्वाचा सन्मान; मुंदडा व जोशी यांना प्रतिष्ठेचे पुरस्कार
अमळनेर : विक्की जाधव.
समाजकार्यातील उल्लेखनीय योगदान आणि सेवाभाव जपणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने जीवन कला संस्कार केंद्र अमळनेर व श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अमळनेर भूषण’ व ‘घ.भी. धांडे सेवाव्रती’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. सन २०२५ २६ या वर्षासाठी ‘अमळनेर भूषण पुरस्कार’ श्री ओमप्रकाशजी मुंदडा, तर ‘घ.भी. धांडे सेवाव्रती पुरस्कार’ डॉ. अविनाशजी जोशी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित या कार्यक्रमाला जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुणेशजी पारनेरकर होते. यावेळी पुरस्कारार्थींनी आपल्या मनोगतातून समाजसेवेच्या प्रवासातील अनुभव आणि कार्याचा ध्यास व्यक्त केला.

प्रमुख अतिथी डॉ. अमळकर यांनी केशव स्मृती समूहाच्या विविध सामाजिक उपक्रमांचा परिचय करून देत समाजहितासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात श्री पारनेरकर यांनी संस्कार आणि संस्कृती यातील फरक स्पष्ट करत व्यक्तीची उन्नती हीच समाजाच्या प्रगतीची खरी पायाभरणी आहे, असे सांगत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकास आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी योगेशजी पाटील यांच्या मधुर बासरीवादनाने वातावरण भारावून गेले. सौ. पपीता जोशी यांनी बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला रंगत आणली. मंचावर जीवन कला संस्कार केंद्राचे अध्यक्ष डॉ. अशोक रावेरकर यांचीही उपस्थिती होती.अमळनेर, सावदा, जळगाव आणि धुळे येथील शिष्यवृंद तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर व परिसरातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतदेऊ शकतो.