महिलांना समान हक्कांसोबत सन्मानही आवश्यक – प्रा. डॉ. नयना नवसारीकर

अपनी भाषा में पढ़े! Translate

महिलांना समान हक्कांसोबत सन्मानही आवश्यक प्रा. डॉ. नयना नवसारीकर

अमळनेर : विक्की जाधव.

जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरतर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहकतीर्थ स्व. बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व अमळनेर महिला मंचच्या अध्यक्ष स्व. डॉ. अपर्णा मुठ्ठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अमळनेरच्या अध्यक्षा सौ. स्मिता चंद्रात्रे यांच्या निवासस्थानी पार पडला.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. नयना नवसारीकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात महिलांना केवळ सहानुभूती नको, तर समान हक्क, अधिकार आणि सन्मान मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

स्त्री ही आयुष्यभर अनेक भूमिका पार पाडत असते मुलगी, भगिनी, पत्नी आणि माता म्हणून ती कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. आजच्या प्रगत समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी पुरुषांनीही घरकामात सहभाग घेऊन कुटुंबाची जबाबदारी सामायिक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात कु. भार्गवी चंद्रशेखर पाटील हिने महिला दिनानिमित्त प्रभावी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रांत महिला आयाम प्रमुख अॅड. भारती अग्रवाल, सौ. वनश्री अमृतकर, सौ. उर्मिला अग्रवाल, सौ. कपिला मुठ्ठे, सौ. अंजू ढवळे, सौ. मेहराज हुसेन यांच्यासह जिल्हास्तरावरील पदाधिकारी मकसूद बोहरी, सतीश देशमुख, विजय शुक्ला, सुनील वाघ, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, गोकुळ पाटील तसेच निवृत्त तहसीलदार उपासनी साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. कपिला मुठ्ठे यांनी केले, तर अॅड. भारती अग्रवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शेवटी सौ. स्मिता चंद्रात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!