सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव यंदा मोठ्या उत्साहात पडणार पार’  अध्यक्ष राहुल बडगुजर

अपनी भाषा में पढ़े! Translate

सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव यंदा मोठ्या उत्साहात पडणार पार’  अध्यक्ष राहुल बडगुजर

अमळनेर : विक्की जाधव.

सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव समितीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत यंदाच्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार असून आदिवासी नृत्य सादरीकरण, लहान मुलांचे कला-कौशल्याचे कार्यक्रम तसेच वारकरी संप्रदायातील टाळ-मृदंगाच्या गजरात भजन-कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

त्यामुळे यंदाची श्रीराम नवमी मिरवणूक अधिक आकर्षक आणि उत्साहपूर्ण होणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.दरम्यान, दि. 26 मार्च 2026, गुरुवार रोजी होणाऱ्या या भव्य मिरवणुकीत सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल बडगुजर व समस्त समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!