बिल्ट कंपनीच्या गेट जवळ ट्रकच्या धडकेत एकाचा अपघाती मृत्यू; भिगवन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

बिल्ट कंपनीच्या गेट जवळ ट्रकच्या धडकेत एकाचा अपघाती मृत्यू; भिगवन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

(निलेश गायकवाड)

भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भादलवाडी येथील बिल्ट कंपनीच्या बी कॉलनी गेट जवळ आयडीबीआय एटीएम च्या समोर भिगवण ते भादलवाडी सर्विस रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 या ठिकाणी काल दिनांक 11 3 2026 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भिगवण येथील अजित दगडू वाळके, वै 54 वर्ष राहणार माऊली अपारमेंट फ्लॅट नंबर 9 भिगवन येथील रहिवाशी असून यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

सदर घटनेत भिगवन पोलीस स्टेशन मध्ये अनिकेत वाळके यांनी फिर्याद दिली असून अज्ञात ट्रक वरील वाहन चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल एम एच 45 एल 59 80 फिर्यादीचे वडील अजित दगडू वाळके वय 54 वर्ष हे भिगवन ते भादलवाडी सर्विस रोडने भिगवन कडे मोटरसायकल एमएच ४५ एल ५९८० यावरून जात असताना भिगवण बाजू कडून भादलवाडी बाजूकडे सर्विस रोडने भरधाव वेगात येणारी अज्ञात ट्रक वरील अज्ञात चालकाने रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील वाहन अति विचाराने भर धाव चालवून फिर्यादीच्या वडिलांचे मोटरसायकल एमएच ४५ एल ५०१० हिला समोरून जोरात धडक देऊन अपघात केला आहे. या अपघातात फिर्यादीचे वडील अजित दगडू वाळके यांचे पोट फाटून गंभीर दुखापत होऊन हाता पायाला किरकोळ दुखापत होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन मोटरसायकल mh45l5980 नुकसानीस कारणीभूत झाला आहे. अपघातात ठिकाणी अज्ञात ट्रक चालक न थांबता तेथून निघून गेला आहे. त्या चालकाविरुद्ध भिगवन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी अमित पाटील हे करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!