स्वारगेट व पुणे जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांचे कामचं कौतुकास्पद; जाणून बुजून केली जात आहे बदनामी

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वारगेट व पुणे जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांचे कामचं कौतुकास्पद; जाणून बुजून केली जात आहे बदनामी

(निलेश गायकवाड)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारी क्षेत्र असो किंवा चोऱ्या व महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्रशासनाच्या वतीने सुरक्षा महामंडळाची स्थापना करण्यात आली. या सुरक्षा महामंडळामध्ये महाराष्ट्र मध्ये संपूर्ण शासकीय व निमशासकीय ठिकाणी सुरक्षा रक्षकांचे फौज तैनात करण्यात आले.

स्वारगेट येथील झालेल्या घटनेनंतर प्रशासनाने अलर्ट मोडवर येत पोलिसांबरोबर सुरक्षारक्षक देखील वाढविण्यात आले. स्वारगेट असेल किंवा शिवाजीनगर किंवा पुणे जिल्ह्यातील त्यांच्या कोणत्याही ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या कामामुळे पोलिसांवरील देखील ताण कमी झाल्याचे पाहायला मिळते. या सुरक्षा रक्षकांच्या मुळे आज ठिकठिकाणी होणारे घटना यावरती आळा बसत आलेला आहे. महिलांना देखील या सुरक्षारक्षकांमुळे सुरक्षा मिळत आहे. रात्रंदिवस जागून आपली सुरक्षा ही आपली जोखीमदारी असल्याने कोणत्याही गोष्टीची परवा न करता वरिष्ठांच्या आदेशानुसार दिलेल्या ठिकाणी व परिसरामध्ये सुरक्षारक्षकांकडून काम हे कौतुकास्पद होत आहे.

पण ह्याच सुरक्षारक्षकांवरती काही जाणून-बुजून आरोप प्रत्यारोप करून त्यांच्यावरती एका बाजूने परिस्थितीचा विचार न करता त्यांना टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. या सुरक्षा रक्षकांनी वेळोवेळी आपल्या ठिकाणी होणाऱ्या हालचालींची माहिती त्यांच्या वरिष्ठांना पाठवून देखील त्यांच्या या कामाचे कौतुक होण्याचे ऐवजी त्यांना कुठेतरी टार्गेट करून त्यांच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महामंडळाने देखील या गोष्टीचा विचार करायला पाहिजे या सुरक्षा रक्षकांमध्ये कितीतरी होतकरू व परिस्थितीने नाजूक असणारे मुलं काम करत त्या मुलांची स्वप्न देखील या कामावरती अवलंबून आहेत. कुठेतरी खोडसाळपणा व जाणून-बुजून टार्गेट करून त्यांच्यावरती लावलेले आरोप हे कुठेतरी चुकीची असल्याचे मत सुरक्षारक्षकांकडून होत आहे. त्यांच्या ज्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रशासनाने याचे कुठेतरी गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांवरती बिनबुडाचे आरोप न लावता त्यांच्या कामाचे कौतुक करण्याची नितांत गरज आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!