शिरपूर शहराच्या विकासासोबतच बोराडी गावातही उपसरपंच राहुल रंधे यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे वेगाने सुरू – अमरिशभाई पटेल

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर शहराच्या विकासासोबतच बोराडी गावातही उपसरपंच राहुल रंधे यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे वेगाने सुरू –  अमरिशभाई पटेल

लोकवर्गणीतून उभारलेले बोराडीचे भव्य शिवमारुती मंदिर…

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने गावात भक्तिमय वातावरण…

बोराडी : शिरपूर शहराच्या विकासासोबतच बोराडी गावातही उपसरपंच राहुल रंधे यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे गावाच्या प्रगतीला नवे बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.बोराडी येथे उभारण्यात आलेले शिव–मारोती मंदिर अत्यंत भव्य, सुंदर आणि मन प्रसन्न करणारे आहे. या मंदिरामुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांना सकारात्मक ऊर्जा व चैतन्य मिळत आहे.बोराडी गावाला कर्मवीर आण्णासाहेबांचा प्रेरणादायी वारसा लाभलेला आहे. रंधे कुटुंबीय हा वारसा धैर्याने व निष्ठेने पुढे नेत आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गावाला अनेक पुरस्कार व सन्मान मिळवून दिले असून बोराडीचे नाव राज्य पातळीपर्यंत पोहोचले आहे.
येत्या काळात बोराडी गावाचे नाव दिल्लीपर्यंत नेण्यासाठी रंधे कुटुंबीय प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांनी केले. ते बोराडी येथील शिव–मारोती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बोलत होते.
बोराडी येथील शिव पंचायत देवता ग्रहयज्ञात्मक शिवमारुती मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळात मंदिर वास्तू पूजन माझी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, शिवलिंग स्थापना माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, हनुमान मूर्ती स्थापना आ. काशीराम पावरा, कलश यात्रा पूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, व देव मोगरा माता मंदिर प्रतिष्ठा मिठगाव आमलाल महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.डी. पाटील, शिसा.का.चे चेअरमन माधवराव पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष भरत पाटील, सांगवी भाजपा मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर भाजपा मंडळ अध्यक्ष विरपाल राजपूत, शिसा.का.चे माजी संचालक साहेबराव पाटील, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे खजिनदार आशाताई रंधे, धुळे नंदुरबार जिल्हा बँकेच्या संचालिका सीमाताई रंधे, नगरसेवक रोहित रंधे, माजी सभापती सत्तारसिंग पावरा, डॉ. हिरा पावरा, माजी सदस्य छगन गुजर, राजेंद्र पाटील, सरपंच सुखदेव मालचे ,शामकांत पाटील,जि.प.सदस्य सखुबाई पारधी, मोहन महाजन, चंद्रसिंग पवार,प.स.सदस्य लताबाई कोकणी, सरपंच हेमंत सनेर, सरपंच अंजदे राजेंद्र पाटील, टेभेपाडा सरपंच बापू पावरा,माजी सरपंच दिलीप तळवी,
यांच्यासह शिरपूर तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व चेअरमन भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी व ग्रामस्थांसह शिवपंथी संत मंडळींचीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अमरीशभाई पटेल पुढे म्हणाले की,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे व उपसरपंच राहुल रंधे त्यांच्या या कार्यामुळे बोराडी गावाचा विकासाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. भविष्यातही बोराडी गाव प्रगतीच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास वाटतो.आदिवासी बांधवांना शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध झाली तर ते शिक्षण घेऊन पुढे मोठ्या पदांवर पोहोचू शकतात. जेव्हा आपल्या गावातील विद्यार्थी शिक्षणाच्या बळावर यश संपादन करतात, तेव्हा आपल्या तालुक्याचे आणि संस्थेचे नावही मोठे होते.या तालुक्यातील एक एक नागरीक सुखी कसा होईल या करीता प्रयत्नशील राहुया विले पार्ले चे हॉस्पिटल तयार होत आहे कमीत कमी पैशात रुग्णांना कसे उपचार मिळतील या करीता हे हॉस्पिटल तयार केलेले आहे असे प्रतिपादन केले.
शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या भव्य शिवमारुती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व धार्मिक विधींमध्ये सहभागी होत सोहळ्याची शोभा वाढवली. तसेच उपसरपंच राहुल रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या मान्यवरांनी त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर साधारणपणे ७० ते ८० वर्षे जुने असून कालांतराने मंदिर जीर्ण अवस्थेत आले होते. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली. त्यानंतर गावातील तरुण पिढीने पुढाकार घेत सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि लोकवर्गणीतून मंदिर उभारण्याचा संकल्प केला.तसेच या उपक्रमाला गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने हातभार लावला. कोणी आर्थिक देणगी दिली, तर कोणी श्रमदान करून कामात सहभाग घेतला. लहान-मोठे, महिला-पुरुष अशा सर्वांनी मिळून मंदिर उभारणीचे कार्य पूर्ण केले. परिणामी आज बोराडी गावात राजस्थानी शैलीतील आकर्षक आणि भव्य शिवमारुती मंदिर उभे राहिले असून ते गावाचे नवे आध्यात्मिक केंद्र बनले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात कलश यात्रा व ध्वजारोहणाने झाली. गावातील महिला, पुरुष व युवकांनी मोठ्या उत्साहाने कलश यात्रा काढली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात निघालेल्या या यात्रेमुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी इंदौर येथून झाकी मागण्यात आली होती त्याचबरोबर ढोल ताशा पथक बँड व पारंपारिक वाद्याने बोराडी गाव शिवमय झाले होते या झाकी मध्ये राधाकृष्ण हनुमंत यांच्या कलागुणांनी प्रेक्षकांचे मनमोहन टाकले होते तसेच यामध्ये विविध प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित भाविक मंत्रमुग्न झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी वेदमंत्रांच्या गजरात गणपती पूजन, पुण्याहवाचन, मांडवपूजन, नवग्रह शांती, आचार्य पूजन, रुद्राभिषेक आदी धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. त्यानंतर शिवलिंग व श्री हनुमान मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
सायंकाळी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. उमेश महाराज दशरते यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनातून अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिवमारुती मंदिर सेवा समिती, बोराडी तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडले.
या सोहळ्यामुळे बोराडी गावात एकात्मता, श्रद्धा आणि भक्तीची भावना अधिक दृढ झाली असून गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ह्या मंदिराची संकल्पना व कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच राहुल रंधे यांनी केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त बोराडी ग्रामस्थ, महिला वर्ग, तरुण मित्रासह, वयोवृद्ध ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदान करून कार्यक्रम यशस्वी केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!