नगरसेवक दीपक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश – नवीन पोलीस ठाणे व वसाहतीचा मार्ग मोकळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा (सागर गायकवाड) – करमाळा शहर आणि तालुक्यातील पोलीस बांधवांच्या निवासाचा आणि कामकाजाचा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे. नगरसेवक तथा भाजप गटनेते श्री. दीपक अरुण चव्हाण यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे करमाळा पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या प्रस्तावित जागेचा कन्सल्टंटकडून सर्व्हे सुरू झाला असून, सॉईल टेस्टिंगचे काम प्रगतीपथावर आहे.
करमाळा पोलीस वसाहतीची सद्यस्थिती अत्यंत बिकट असून अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार सध्याचे पोलीस स्टेशन अपुरे पडत होते. ही बाब लक्षात घेऊन दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांना पत्राद्वारे विनंती केली होती. तालुक्याची ३ लाखांची लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता, सुसज्ज पोलीस वसाहत आणि प्रशासकीय इमारत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादितच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या कन्सल्टंटकडून सध्या जागेची तांत्रिक तपासणी सुरू आहे. यामध्ये जमिनीत किती फुटावर खडक आहे आणि मातीचा प्रकार कोणता आहे, याची तपासणी करण्यासाठी बोअरवेलद्वारे सॅम्पल्स घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इमारतीचे लाईनआउट पूर्ण झाले असून, सॉईल टेस्टचा अहवाल प्राप्त होताच कामाचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) तयार केले जाईल. यानंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
नवीन पोलीस ठाणे आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त वसाहत निर्माण झाल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन कायदा-सुव्यवस्था राखणे अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“करमाळा पोलीस बांधवांची गैरसोय दूर व्हावी आणि शहराला एक सुसज्ज पोलीस स्टेशन मिळावे, यासाठी आमचा प्रयत्न होता. प्रशासकीय मान्यता आणि निधी मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आता यश येत असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.”
— दीपक अरुण चव्हाण (नगरसेवक तथा गटनेता भाजप, करमाळा)

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!