नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपाध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवकांच्या पुढाकाराने करमाळ्यात घरकुल योजनेचा धडाका – ४४ लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे, तर ५० लाखांच्या निधीचे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहराच्या विकासासोबतच गरिबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्यासह सर्व नगरसेवकानी घरकुल लाभार्थ्यांना धनादेश देताना केले . सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी श्री. ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत आणि उपाध्यक्ष तथा शिक्षण व ग्रंथालय सभापती अतुल फंड यांच्या सर्व नगरसेवकांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नवीन ४४ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.


यावेळी पूर्वी मंजूर झालेल्या ९० घरकुलांसाठी आलेल्या ९० लक्ष रुपयांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात ५० लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे एकूण ५० लक्ष रुपयांच्या निधीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास बांधकाम सभापती लता घोलप, पाणी पुरवठा सभापती विक्रमसिंह परदेशी, आरोग्य सभापती पूजा इंदलकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच नगरसेवक संजय सावंत, रवी जाधव, प्रशांत ढाळे, युवराज चिवटे, दिपक चव्हाण, सचिन घोलप, संदीप कांबळे, सिद्धेश लावंड, सुनील बनसुडे आणि नगरसेविका जबीन मुलाणी, ज्योत्सना लुणिया, स्वाती फंड, साजेदा कुरेशी, सुवर्णा आलाट, अश्विनी अब्दुले, सुनिता ढाणे, चैताली सावंत, रामभाऊ ढाणे, महादेव फंड, सचिन गायकवाड, विजय घोलप यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक पत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना नगराध्यक्षा मोहिनी सावंत आणि उपाध्यक्ष अतुल फंड व मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी लाभार्थ्यांना आवाहन केले की, ज्या लाभार्थ्यांना नवीन मंजुरी मिळाली आहे, त्यांनी तातडीने नगरपरिषदेकडून बांधकाम परवाना प्राप्त करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करावी. तसेच ज्यांना पहिल्या हप्त्याचा धनादेश मिळाला आहे, त्यांनीही वेळेत बांधकाम पूर्ण करावे, जेणेकरून पुढील हप्ते मिळण्यास अडचण येणार नाही.
यावेळी सर्व घरकूल योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!