दौंड येथे संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरात ११५ जणांनी केले मानवतेप्रती रक्तदान …
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, ०८ मार्च २०२६ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ११५ युनिट रक्त संकलन करण्यात आले. ससून शासकीय रुग्णालय रक्तपेढी यांनी हे रक्त संकलन करून विशेष योगदान दिले.
संत निरंकारी मिशनद्वारे निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला होता कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, तर ते नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’ म्ह्णून संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर हा पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन तर्फे दौंड परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी दौंड परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश देखील पोहोचविण्यात आला. या शिबीराचे उदघाटन दौंड पंचायत समितीच्या सदस्या सौ सुमनताई निकाळजे (गिरमे) यांनी केले. या शिबिराला दौंड नगरीच्या नगराध्यक्षा कु.दुर्गादेवी जगदाळे, डी वाय एस पी सचिन डहाळे साहेब, पंचायत समिती सदस्य साहेबराव पोळ समवेत नानगाव सेक्टरचे प्रमुख विलास रासकर सह अनेक संत निरंकारी मिशनचे अनुयायी आवर्जून उपस्थित होते ,आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार दौंड शाखेचे प्रमुख शिवाजी होले यांनी मानले.