शिरपूर तालुक्याचे युवा नेते तसेच बोराडी गावाचे उपसरपंच आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचे जिल्हाध्यक्ष मा. आबासो राहुल विश्वासराव रंधे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक बाबासो रोहित रंधे यांनी आबासो राहुल रंधे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. समाजकार्य, युवकांना मार्गदर्शन आणि विकासकामांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अखिल भारतीय धोबी समाज मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सदाशिव ठाकरे सर, उद्योजक अशोकजी बेडीसकर, न्यायिक समितीचे विभागीय प्रमुख उमेश खैरनार, अखिल भारतीय परीट सेवा मंडळाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील सुर्यवंशी, न्यायिक समितीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, माजी तालुकाध्यक्ष योगेश भाऊ धोबी, लॉन्ड्री असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जितुभाऊ बोरसे (गोलू) तसेच शहराध्यक्ष नितीन जाधव यांनीही रंधे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आबासो राहुल रंधे यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.