‘प्रताप’च्या विद्यार्थ्यांनी केला स्थापत्य कलेचा अभ्यास इतिहास विभागाचा अभिनव उपक्रम..
अमळनेर : विक्की जाधव.
प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी उदयपूर, चितोडगड, धार, मांडवगड, बाग लेणी येथे दिनांक 22,23, आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी भेट दिली.ही भेट शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे आहे, केवळ दैनंदिन पाठ्यपुस्तकाचा अभ्यास न करता प्रत्यक्ष अनुभवातून देखील अभ्यास केला पाहिजे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत शैक्षणिक सहल उपयुक्त होती. या शैक्षणिक सहलीचा हेतू म्हणजे प्राचीन भारतीय कला व स्थापत्य कलेचा सूक्ष्म पद्धतीने पाहणी करून अभ्यास करणे, ऐतिहासिक स्थळाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव व त्यांच्या जतनाची भावना वृद्धिगत करणे ही होती.

यानंतर विद्यार्थ्यांनी उदयपूर येथील जल व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असलेली व्यवस्था पिचोला तलाव बघून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती घेतली. किल्ल्यावरील स्मारके, मंदिरे, आणि स्तंभ यांच्या विषयी सविस्तर माहिती घेऊन सामरीक दृष्टिकोनातून किल्ल्याचे महत्त्व जाणून घेतले. त्यानंतर त्याच दिवशी प्राचीन ऐतिहासिक मंदिर असलेल्या पशुपतिनाथ महादेव मंदिराला भेट देऊन प्राचीन स्थापत्यातील नागर शैलीच्या मंदिराविषयी सविस्तर माहिती घेतली.
मांडवगड या मध्ययुगीन भारतातील इंडो इस्लामिक शैलीच्या स्थापत्याचा अभ्यास करण्याकरिता अनेक महत्त्वपूर्ण नोंदी घेतल्या त्यामधील शहराच्या बाहेरील बाजू स असलेले दरवाजे जहाज महाल, राणी रूपमतीचा महाल, आज बहादुर महाल, आणि होशंग शहा चा मकबरा, व जामा मशीद या ठिकाणांना भेट देऊन मध्ययुगीन भारतीय स्थापत्य कलेचा उदय आणि विकास यांचा सविस्तर आराखडा आपल्यासमोर ठेवून स्थापत्य कलेविषयी महत्वपूर्ण माहिती घेतली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचीन भारताच्या स्थापत्याचे एक उत्तम उदाहरण असलेल्या बाग या लेणीला भेट दिली. या लेणीतील सुंदर रंगीत चित्रे, त्या चित्रांमध्ये असलेल्या जातक कथा आणि जातक कथेद्वारे बुद्धाचे जीवन चरित्र रंगवण्याचा कलाकारांचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. या सहलीकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव, आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डॉ. मुकेश भोळे व इतिहास विभाग प्रमुख डॉ. धनंजय चौधरी यांनी प्रोत्साहन दिले.
प्रस्तुत सहलीकरिता इतिहास विभागाचे प्राध्यापक विजय साळुंखे यांनी विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण आयोजन करून अथक परिश्रम घेऊन ही शैक्षणिक सहल पूर्ण केली. याशिवाय त्यांच्यासोबत पदार्थ विज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. प्रियंका पाटील यांनी ही शैक्षणिक सहल यशस्वी होण्याकरिता मोलाची मदत केली.