चार तास रंगली चर्चा; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
अमळनेर : विक्की जाधव.
नुकतीच झालेल्या नगरपालिका जनरल मीटिंगमध्ये राजकीय वातावरण अक्षरशः तापलेले पाहायला मिळाले. विरोधकांनी विविध विषयांवर प्रश्नांची सरबत्ती केली असताना, सत्ताधाऱ्यांनीही आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका घेत प्रत्युत्तरांचा मारा केला. एकहाती सत्ता असतानाही विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देण्याची तयारी दाखवत सभागृहात तब्बल चार तास जोरदार चर्चा रंगली. आरोप-प्रत्यारोप, टाळ्यांचा कडकडाट आणि शेरोशायरीच्या फटकार्यांनी वातावरण चांगलेच रंगतदार झाले होते.

शिरीष दादा चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नगरसेवकांनी ठाम भूमिका घेत “प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ” असा निर्धार सभागृहात प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. गटनेते पंकज पंडित चौधरी, महेश भाऊ देशमुख, उपनगराध्यक्ष प्रशांत भाऊ निकम, तसेच नगरसेवक श्रीराम आबा, नाविद शेख, दादा पवार आणि कैलास तात्या पाटील यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड प्रतिवाद करत विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा रंगली.
दरम्यान, या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांचे मुद्दे प्रभावी ठरले की सत्ताधाऱ्यांनीच खेळ फिरवला, यावर आता चर्चा रंगणार आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली नगरपालिकेच्या सभागृहात आज लोकशाहीचा जिवंत आणि तापलेला चेहरा पाहायला मिळाला. तों मागील इतिवृत्त वाचून कंटिन्यू करणे या मुद्द्यावरून कारण मागील प्रशासनाच्या काळात काही झालेली कामे तर काही अर्धवट राहिलेले कामे ही होती त्यावेळी काही मोजक्या ठेकेदारांनाच काम दिले जात होते ते कामे थांबवण्यासाठी काहींनी प्रयत्न केले. अशा विविध मुद्द्यावर छान चर्चा रंगली होती. तर अशा गुंतागुंतीच्या विषयावर पूर्व अभ्यास करून पुढील मीटिंगमध्ये चर्चेत घेऊ असे पीठासीन अध्यक्ष यांनी सांगितले.