ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीत नगरसेवक डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीत नगरसेवक डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

 

अमळनेर : विक्की जाधव.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवर सचिव संजय महाडेश्वर यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी आदेशान्वये येथील ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीची रचना करण्यासंदर्भात सूचित केले होते. त्यानुसार येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांनी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी समितीची रचना केली. त्यात येथील नगरसेवक डॉ. डिगंबर विठ्ठल महाले यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

सदर सनियंत्रण व सल्लागार समितीची करण्यात आलेली रचना पुढीलप्रमाणे. अध्यक्ष : आमदार अनिलदादा भाईदास पाटील, सदस्य : पंचायत समितीचे दोन सदस्य तथा प्रशासक, नगरसेवक डॉ. डिगंबर विठ्ठल महाले, अशासकीय संस्थेच्या (एनजीओ) प्रतिनिधी डॉ. भारतीताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते (महिला)- सौ. पद्मजा रवींद्र पाटील, (पुरुष)- विक्रांत भास्करराव पाटील तसेच समितीतील पदसिद्ध शासकीय सदस्य : मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, जळगाव, मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर, मा. उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर, मा. पशुसंवर्धन अधिकारी, अमळनेर, मा. तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर, तसेच सदस्य सचिव : मा. वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर, जि. जळगाव यांचा समावेश आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!