अमळनेरमध्ये अवैध गोवंश वाहतूक उघड; दोन बैलांसह मालवाहू जप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये अवैध गोवंश वाहतूक उघड; दोन बैलांसह मालवाहू जप्त

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात गोपनीय पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत दोन बैलांसह मालवाहू वाहन जप्त केले. प्रकरणी चालकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत पो. कॉ. ९९५ नितीन दिलीप कापडणे हे सहकाऱ्यांसह शहरात गोपनीय गस्त घालत होते. त्यावेळी गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गलवाडे–अमळनेर मार्गावरील दाजीबा नगरसमोर एक मारुती सुझुकी सुपर कॅरी (क्र. एमएच-१९ सीवाय-५९१७) या मालवाहू वाहनातून गोवंशाची संशयास्पद वाहतूक सुरू असल्याची खबर मिळाली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता सदर वाहन रस्त्याच्या कडेला उभे आढळले. वाहनाची पाहणी केली असता दोन बैल दाटीवाटीने भरून त्यांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. चालक उज्वल रविंद्र पाटील (वय २५, रा. धार, ता. अमळनेर) याच्याकडे वाहतुकीचा परवाना तसेच पशुवैद्यकीय तपासणीचा दाखला नसल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीत हे बैल रऊफ कुरेशी (रा. बेटावद, ता. जि. धुळे) यांच्याकडून घेऊन नेरी (ता. जामनेर) येथे नेत असल्याची माहिती चालकाने दिली. जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये एक सुमारे ७ वर्षे वयाचा गावरान जातीचा पांढऱ्या रंगाचा बैल (अंदाजे किंमत १८,००० रुपये) व एक सुमारे ६ वर्षे वयाचा जर्सी जातीचा तपकिरी बैल (अंदाजे किंमत १५,००० रुपये) यांचा समावेश आहे. तसेच सुमारे २ लाख रुपये किंमतीचे मालवाहू वाहन जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत २ लाख ३३ हजार रुपये आहे.प्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणारा कायदा कलम ११ (ड)(ई)(फ)(क), भा. न्यायदंड संहिता कलम ३(५) तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पो. ना. ३०५१ सिद्धांत बळवंत सिसोदे, पो. कॉ. १५४१ विलास गजानन बागुल व पो. कॉ. ६१७ रविंद्र रमेश बोरसे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहे कॉ. विनोद सोनवणे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!