अमळनेर शहरातील पिंपळे रस्त्यावर भरदिवसा धाडसी लुटीची घटना घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर शहरातील पिंपळे रस्त्यावर भरदिवसा धाडसी लुटीची घटना घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील पिंपळे रस्त्यावर भरदिवसा धाडसी लुटीची घटना घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. बाजार समितीतील व्यापारी यतीन कोठारी यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली.

ही घटना सकाळच्या सुमारास घडली असून, व्यापारी आपल्या स्कुटीवरून जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे व्यापारी काही क्षण गोंधळून गेले आणि त्याच संधीचा फायदा घेत चोरटे पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, भरदिवसा अशा पद्धतीने लूट झाल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली असून, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!