आमदार रोहित दादा पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी – मुस्तकीम पठाण, तालुकाध्यक्ष रोहित पवार फाउंडेशन करमाळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजित (दादा) पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अपघाती मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी सीबीआय मार्फत होऊन सत्य जनतेसमोर यावे, ही राज्यातील जनतेची व कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. संबंधित विमान दुर्घटना ही केवळ अपघात होता की घातपात, याचा सखोल उलगडा व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे युथ आयकॉन आ.रोहित(दादा)पवार हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने व निर्भीडपणे लढा देत आहेत.


त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने Threat Assessment करून त्यांना ‘Z+’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी रोहित दादा यांचे निष्ठावंत व रोहित पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.ता.करमाळा चे तालुकाध्यक्ष मुस्तकीम ऊर्फ एम डी पठान यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना मागणी केली आहे यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जमिर भाई सय्यद,रमजान बेग,अमोल सुरवसे,आमिर सय्यद,जावेद पठान,सारंग परदेशी,जगदीश शिंदे,गणेश कोकाटे,अभिजीत चव्हाण,नागेश कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!