करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा ते घारगाव या रस्त्यावरून मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे रस्त्याची सुरक्षितता आणि सुलभतेसाठी योग्य ठिकाणी आणि सुस्पष्ट भाषेतील दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे.
करमाळा ते घारगाव पर्यंत जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याचे विभाजन झालेले आहे धायखिंडी, संगोबा, निलज, पोटेगाव, बालेवाडी, तरडगाव, पाडळी दुसरीकडे बोरगाव त्यानंतर वाघाची वाडी असे अनेक रस्ते विभाजन झालेले आहे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकासाठी गोंधळ निर्माण होतो प्रत्येक वेळी त्यांना कोणालातरी विचारपूस करूनच पुढे जावे लागते हे फलक योग्य ठिकाणी वळणांच्या ठिकाणी रस्ता विभाजनाच्या ठिकाणी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून वाहन चालकांना मार्गदर्शन मिळेल रस्त्याच्या अनेक ठिकाणी विशेषता जिथे अनेक रस्ते मिळतात तिथे दिशादर्शक फलक लावल्यास प्रवाशांना दिशा मिळण्यासाठी मदत होईल.

जुने किंवा खराब झालेले फलक दुरुस्त करावेत किंवा बदलले जावेत आणि वळण रस्ते स्पष्टपणे दर्शवणारे फलक बसवावेत वाहन चालकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक जागोजागी लावणे गरजेचे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून दिशादर्शक फलकांची जागा निश्चित करून मराठी भाषेमध्ये हे फलक लावावे अशी वाहन चालकांची आणि प्रत्येक गावच्या ग्रामस्थांची मागणी आहे यामध्ये दिशेसोबतच संबंधित गावाचे अंतर किलोमीटर मध्ये दर्शविल्यास वाहन चालकांना त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकेल.
थोडक्यात रस्त्यावरील दिशादर्शक फलक वाहतुकीच्या शिस्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही करून ते बसवण्यात यावेत अशी मागणी घारगावच्या माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी केली आहे.