करमाळकरांच्या जिभेवर रेंगाळणार ‘दत्त भेळ’ची चटपटीत चव २२ फेब्रुवारीला भव्य शुभारंभ

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- इचलकरंजी येथे सन १९७८ पासून खवय्यांच्या पसंतीस उतरलेली आणि चवीचा वेगळा ठसा उमटवलेली ‘दत्त भेळ’ आता करमाळकरांच्या सेवेत दाखल होत आहे. रविवारी, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता श्री देवीचामाळ रोड, कॅप्री गोल्ड लोन शेजारी, महालक्ष्मी साडी सेंटर, कृष्णाजी नगर, करमाळा येथे भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणून पर्यटन विभाग मंत्रालयाचे कक्ष अधिकारी संदिप कदम यांची उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायाचा शुभारंभ आई-बाबा श्री स्वामी समर्थ सेवेकरी, करमाळा यांच्या शुभहस्ते करून सुरुवात केली जात आहे.
‘दत्त भेळ’ने १९७८ सालापासून आपल्या दर्जेदार चवीने ग्राहकांचे मन जिंकले आहे. आता हीच चव आणि तेच प्रेम घेऊन आशिष वसंत न्हावकर आणि समस्त न्हावकर परिवाराने करमाळ्यातील खवय्यांसाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिले आहे. देवीचामाळ रोडवरील कृष्णाजी नगर भागात सुरू होत असून, येथे स्वच्छ आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी मिळणार आहे.
नवीन व्यवसायाच्या निमित्ताने करमाळा परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांकडून न्हावकर परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन न्हावकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!