हिंगोने खु. प्र. ज. येथे शिवजयंती जल्लोषात; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग..
अमळनेर : विक्की जाधव.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन सोहळा पार पडला. भगव्या पताकांनी सजलेले परिसर, जयघोषांनी दुमदुमलेले वातावरण आणि शिवभक्तांचा उसळलेला उत्साह यामुळे संपूर्ण गाव शिवमय झाले होते. महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांच्या शौर्य, धैर्य आणि लोककल्याणकारी विचारांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख भूषण कोळी, माजी सरपंच प्रवीण पाटील, ग्रामसेवक पवन वाघ, शिपाई देवराम कोळी, महेंद्र ठाकरे सर, बबलू पाटील, प्रकाश कोळी, अंकित पाटील, आधार कोळी, गुलाब कोळी, संजय पाटील, विनोद बैसाणे, पवन कोळी, संभाजी पाटील, दगडू पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून शिवचरित्राचा आदर्श अंगीकारत गावाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.