अमळनेरात शिवजयंतीचा जल्लोष; भव्य शोभायात्रेतून शिवभक्तांची अभिवादनांची सरबत्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरात शिवजयंतीचा जल्लोष; भव्य शोभायात्रेतून शिवभक्तांची अभिवादनांची सरबत्ती

अमळनेर : विक्की जाधव.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर नगरीत अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पाच पावली देवी संत गाडगेबाबा चौक येथून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, दिमाखदार मिरवणूक आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. बसस्टॅन्ड, महाराणा प्रताप चौक, मंगलमूर्ती चौक मार्गे मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे पोहोचली. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत महाराजांना अभिवादन केले.

शोभायात्रेदरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाणी व कोल्ड्रिंक वाटप करून शिवभक्तांची तहान भागवली. उत्सवात सहभागी झालेल्या बालवीर व्यायाम शाळा बंगाली फाईल प्रस्तुत पथकाने देखील शिस्तबद्ध सहभाग नोंदवत वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण केला. नाट्यगृह येथे रणजित शिंदे यांच्या वतीने शिवभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शेकडो शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी मा. आमदार कार्यसम्राट शिरीष दादा चौधरी तसेच अमळनेर नगरीचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी कोल्ड्रिंक वाटप कार्यक्रमात स्वतः सहभाग घेत शिवभक्तांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उर्जा मिळाली. सामाजिक एकात्मता, सेवाभाव आणि शिवचरित्रावरील अढळ श्रद्धेचे दर्शन घडवणारा ठरला..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!