फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी..

 

अमळनेर : विक्की जाधव.

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व. प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी.फार्मासी या महाविद्यालयामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदूमून गेला होता.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रविन्द्र सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.​याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे गडकिल्ल्यांचे व्यवस्थापन, शिस्त आणि रयतेच्या कल्याणाचा विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!