भिगवण शेटफळ गटावर राष्ट्रवादीचे वर्चस्व;राष्ट्रवादीचे तिन्हीही उमेदवार विजयी

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण शेटफळ गटावर राष्ट्रवादीचे वर्चस्व;राष्ट्रवादीचे तिन्हीही उमेदवार विजयी

(निलेश गायकवाड)

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भिगवन शेटफळ गटावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपले वर्चस्व स्थापित केले. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून सौ मेघना तुकाराम बंडगर तर भिगवण पंचायत समिती गणातून सौ हेमताई पद्माकर माडगे, तर शेटफळघडे पंचायत समिती गणातून जितेंद्र वनवे यांनी विजयी मिळविला आहे.

यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीनही उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार यामध्ये त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी देखील मिळालेल्या अपयशीची जबाबदारी घेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून आलेले तिन्ही उमेदवार यांनी आपण आज मिळालेल्या यशाबद्दल व विजयाबद्दल सर्वस्वी श्रेय हे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना समर्पित करून भिगवण शेटफळ गटातील प्रलंबित असलेले प्रश्न व विकासावरती आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे बोलताना सांगितले.

विजयी उमेदवारांचे भिगवन शेटफळ गटातील सर्व नागरिकांनी स्वागत करत शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!