राज्यात ७० हजार पदांची लवकरच भरती; नव्या पद्धतीने प्रक्रिया राबवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यात ७० हजार पदांची लवकरच भरती; नव्या पद्धतीने प्रक्रिया राबवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

राज्यात लवकरच सुमारे ७० हजारांहून अधिक रिक्त पदांची नोकरभरती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, ही प्रक्रिया नव्या व पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५० हजार तर एमपीएससीबाहेरील २० हजार पदांचा समावेश असेल.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, पात्रता, सेवा प्रवेश नियम व कामाच्या स्वरूपाचा विचार करून निर्णय घेतले जातील. मनुष्यबळ व्यवस्थापन व भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल.

राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नसून, शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने सादर केलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल देशात सर्वाधिक प्रशंसनीय ठरले, तसेच इतर राज्यांनाही हे मॉडेल स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा व विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. पासपोर्टसारख्या संवेदनशील कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्याने, इतर विभागांनीही ब्लॉकचेन व डिजीलॉकर प्रणालीचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश देण्यात आले.

भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी प्रक्रिया स्वच्छ, वेगवान व विश्वासार्ह असणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. येत्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!