पीरगोस पाक उर्सनिमित्त कसाली मोहल्ल्यात भव्य लंगर; सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

पीरगोस पाक उर्सनिमित्त कसाली मोहल्ल्यात भव्य लंगर; सामाजिक सलोख्याचा उत्सव 

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर येथील कसाली मोहल्ल्यात पीर गोस पाक उर्सनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य लंगरचे आयोजन करण्यात आले. श्रद्धा, सेवा आणि समतेचा संदेश देणाऱ्या या लंगरमध्ये सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला. लंगर व्यवस्थापनात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त योगदान देत शिस्तबद्ध व सुसंस्कृत वातावरणात भाविकांची सेवा केली. उर्सनिमित्त परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

या वेळी नगरसेवक नासिर हाजी साहब, माजी नगरसेवक फिरोज पठान, नगरसेवक नवीद शेख, मौलाना साजिद रजा, रहेमान मौलाना यांच्यासह अमीर खा मिस्त्री, इमरान शेख, गुलाम नबी पठान,

जहुर मिस्त्री, साबिर पठान तलाठी, रमजान शाह, वसीम पठान, अहमद झुलेवाले, अरमान हलवाई, कामिल शेख, कुतुब शेख, बिलाल सैय्यद, अब्बूल वहाब शेख, कलीम मनियार, नईम पठान, समीर शेख, रिजवान जब्बार मनियार, वसीम बेलदार, अजहर मुजावर, तोसिफ शेख, आदिल शेख, फहीम पठान, शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत सामाजिक एकतेचे हे उदाहरण प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!