ऐसी क्या है मजबुरी?? पोलीस हतबल का झाले?

अपनी भाषा में पढ़े! Translate

ऐसी क्या है मजबुरी??
पोलीस हतबल का झाले?
माझ्यावर झालेल्या भ्याड हल्याला आज तीन दिवस झाले तरी देखील पोलिसांना आरोपींचा कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांचे एकच पालूपद सुरू आहे, CC फुटेज तपासले आहेत. आरोपी सापडत नाहीत आणि त्यांचा तपास सुरू आहे. यात माझे म्हणणे असे आहे की सदर मारेकरी हे सुपारी देऊन बाहेरून बोलवले असल्यामुळे सापडणे अशक्य आहे. कारण ज्या राजकीय व्यक्तीने सूड भावनेने माझ्यावर हल्ल्या करण्यासाठी या गुंडांना सुपारी दिली, त्यांना आणून हल्ला झाल्यानंतर सुरक्षित स्थळी परत रवाना करणे हे कार्य त्यांनी इमाने इतबारे केलेले आहे. त्यामुळे या हल्लेखोरांना शोधायचे असेल तर या प्रकरणातील मी ज्यांच्यावर सूत्रधार म्हणून संशय व्यक्त केला आहे, त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून हल्लेखोरांचा ठावठिकाणा शोधून काढता येणे सहज शक्य आहे. परंतु पोलीस नेमके हीच बाब टाळत आहेत. कारण या सूत्रधारांचे हात वरपर्यंत पोहोचले आहेत. त्यांना हात लावू नये, असे आदेश कदाचित त्यांच्या आश्रयदात्यांनी पोलिसांना दिले असावेत. या सूत्रधारांनी केलेला हा पहिला आणि एकमेव हल्ला नसून यापूर्वी त्यांनी नियोजनबद्दरित्या अनेक हल्ले त्यांच्या विरोधकांवर केलेले आहेत. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यामुळे हल्ला करून तो कसा पचवायचा किंवा लपवायचा? यात ते तज्ञ आहेत.
मी पुन्हा पुन्हा पोलिसांना विनंती करीत आहे की, आपण या सूत्रधारांना ताब्यात घ्या, त्यांची माहिती मी माझ्या एफ आय. आर.मध्ये सुद्धा दिलेली आहे.आणि ही माहिती किंवा संशय मी विनाकारण व्यक्त केलेला नाही. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत मी पॅनल क्रमांक पंधरा मध्ये उभ्या असलेल्या धनंजय बोराडे व त्यांच्या अन्य सहकार्यांबद्दल वस्तूनिष्ठ माहिती लिहून मतदारांची जनजागृती केली होती केली होती. त्याचा परिणाम म्हणून क्रमांक 15 मधील धनंजय बोराडे यांचे पूर्ण पॅनल पराभूत झाले. त्यामुळे धनंजय बोडारे व त्यांच्या बंधूंचा माझ्यावर राग असणे स्वाभाविक आहे. त्यानंतर देखील हल्ल्याच्या आदल्या रात्री मी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रविंद्र चव्हाण यांना जाहीर आवाहन करून धनंजय बोडारे यांना स्वीकृत नगरसेवक करू नये, त्या जागी एखाद्या ज्येष्ठ अनुभवी व निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची वर्णी लावावी, अशी मागणी केली होती.
त्यामुळे निवडणुकीत पराभव तर झालाच वरून आता स्वीकृत नगरसेवक पदही माझ्यामुळे मिळणार नाही, असे वाटल्याने लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता माझ्यावर पूर्वनियोजित कटकारस्थान करून व रेकी करून माझ्या हालचालीची माहिती हल्लेखोरांना देऊन नियोजनबद्धरित्या हा भेकड हल्ला करण्यात आलेला आहे, असा माझा ठाम आरोप आहे. पोलिसांनी या आरोपाची शहनिशा करण्याऐवजी आरोपी सापडत नाहीत, हेच रडगाणे लावले आहे. त्यामुळे काखेला कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार पोलिसांनी सुरू केला आहे. या हल्ल्याचा निष्पक्षपातीपणे तपास होऊन प्रथम सूत्रधार व नंतर हल्लेखोर यांना अटक करावी, अशी मागणी असताना सूत्रधार सोडून पोलीस अज्ञात हल्लेखोरांच्या मागे धावत आहेत. या प्रकरणात मी पोलिसांवर शंभर टक्के विश्वास ठेवून संयमाने वाट पाहत आहे. परंतु पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटली आहे, असे मला वाटते. पोलीस सूत्रधारांना हात लावण्यास धजावत नाहीत, ते कायदा सुव्यवस्था व संविधानापेक्षा मोठे आहेत का? हाच माझा सवाल आहे. यातील एक सूत्रधार एका वाहिनीवर- माझा याच्याशी काही संबंध नाही. मी मालवणकर चे लेख वाचत नाही, त्यात वाचण्यासारखे काही नसते, असे अकलेचे तारे तोडले आहेत. कोणताही आरोपी किंवा सूत्रधार अशा हल्ल्याची जबाबदारी स्वतःवर कधीच घेणार नाही. पोलिसांच्या खाक्यानंतरच ते कबूली जबाब देतात. पोलीसांनी योग्य दिशेने तपास केला तर सूत्रधार व हल्लेखोर हे अवघ्या काही तासात जेरबंद होऊ शकतात.
या प्रकारे वाट पाहून काही निष्पन्न झाले नाही तर अन्य सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी मला कायदेशीर हालचाल करावी लागेल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!