अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी मोटारसायकल चोराला शिताफीने घेतले ताब्यात! 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी मोटारसायकल चोराला शिताफीने घेतले ताब्यात! 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त.

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर व धुळे परिसरात मोटारसायकल चोरीचे सत्र चालवणाऱ्या चोरट्याला अमळनेर पोलिसांनी अचूक तपास व तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त खबर्‍यांच्या आधारे पोलिसांनी  झडप घालत संशयितास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख ३० हजार रुपये आहे.

जप्त दुचाकींमध्ये हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस (काळा-ग्रे), तसेच सुझुकी अ‍ॅक्सेस १२५च्या दोन स्कुटी (काळी व निळी) यांचा समावेश आहे. वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांक पडताळून चोरीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे शहरातील वाहनधारकांमध्ये दिलासा मिळाला असून, वाढत्या दुचाकी चोरीवर अमळनेर पोलिसांचा कडक अंकुश दिसून आला आहे. नागरिकांनीही वाहन सुरक्षिततेबाबत दक्षता बाळगावी, असे आवाहन पो.नि दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!