बारामती विमान अपघात : महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा. असा नेता होणे नाही..
महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा हादरवणाऱ्या बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. प्रत्येक डोळ्यात अश्रू प्रत्येक मनात पोकळी निर्माण झाली आहे. यासंदर्भात अमळनेर चे आमदार अनिल दादा पाटील यांनीही प्रतिक्रिया देताना “दादा गेले नाहीत… माझा आनंद, माझे स्वप्न आणि माझा आत्मविश्वास घेऊनच गेले,” असे म्हणत त्यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अनिल पाटील म्हणाले,
दादांचा तो पाठीवरचा हात म्हणजे माझ्यासाठी पुन्हा श्वास घेण्यासारखं होतं,” असे सांगताना अनिल पाटील यांचा आवाज गहिवरला.तो हात राजकारणाचा नव्हता, तो वडिलकीचा, मायेचा आणि विश्वासाचा होता. राजकीय वादळात अनेक जण दूर गेले, मात्र अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षाने मला मुख्य प्रतोद केले, नंतर कॅबिनेट मंत्रीपद दिले.“एका सामान्य कार्यकर्त्याला एवढं मोठं व्यासपीठ देणारा नेता पुन्हा होणार नाही,” असे ही त्यांनी सांगितले.
“तो फोन आता कधीच लागणार नाही… दादा कायमचे नॉट रीचेबल झाले,”
हे बोलताना शब्द थांबले, पण अश्रू थांबले नाहीत. महाराष्ट्राने एक धडाडीचा नेता गमावला आणि मी माझा आधार, माझा आनंद, माझा दादा गमावला…