“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा”
अमळनेर : विक्की जाधव.
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे ७७वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या जल्लोषात, उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील,प्रमुख अतिथी डॉ. प्रतिभा मराठे, प्राचार्य डॉ.निरज चव्हाण यांच्यासह विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर कवायत संचलनाचा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. पूर्वप्राथमिक स्तरातील चिमुकल्यांनी भक्तीवर गीतावर नृत्य सादर केले. त्यानंतर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगत सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या शेवटी ॲड.ललिता पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारत प्रजासत्ताक ७७ वर्षे होऊन देखील आपण आजही खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालो नसून वाढता दहशतवाद, महिलांची असुरक्षितता व वाढते अत्याचार यातून मुक्त झालो नसून महिला जेव्हा सुरक्षित होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र होईल असे मनोगत व्यक्त केले.