डी. आर. कन्या शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
अमळनेर : विक्की जाधव.
येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित डी. आर. कन्या शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. वाघ सर यांच्या शुभहस्ते २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध परेड संचलन करत ध्वजास मानवंदना दिली. संगीताच्या तालावर सादर केलेल्या कवायतीने उपस्थितांची मने जिंकली, तर देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली.

या प्रसंगी शाळेतील प्राविण्यप्राप्त व नुकतेच ट्रॉफी मिळवलेल्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. एस. पी. बाविस्कर मॅडम, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. बी. जे. आठवले मॅडम, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. डी. एन. पालवे, श्री. शामभाऊ पवार, श्री. एस. एस. माळी तसेच सेवानिवृत्त सेना अधिकारी श्री. सुनील पगारे साहेब उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. आर. एस. सोनवणे मॅडम व क्रीडाशिक्षक श्री. के. आर. बाविस्कर सर यांनी केले.