प्रताप महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे अतिथी व्याख्यानाचे आयोजन
अमळनेर : विक्की जाधव.
प्रताप महाविद्यालय येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सिरम इन्स्टिट्यूट, पुणे येथील श्री. कैलास फुलदेवरे (मॅनेजर – डाऊन स्ट्रीम प्रोसेसिंग) यांनी “Opportunities in Pharmaceutical Industries” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते, त्यांनी अतिथींचा सत्कार करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात विभागप्रमुख प्रा. शशिकांत जोशी यांनी विभागाची माहिती दिली. प्रा. हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी अतिथींचा परिचय करून दिला, तर प्रा. नूतन बडगुजर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आपल्या ओघवत्या व अनुभवाधारित भाषणातून श्री. फुलदेवरे यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर फार्मास्युटिकल उद्योगात उपलब्ध असलेल्या विविध नोकरीच्या संधी, मुलाखतीसाठी आवश्यक तयारी, विचारले जाणारे प्रश्न व अपेक्षित उत्तरे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगताची स्पष्ट दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ममता महाजन यांनी आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षाचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे, हिंदी विभागप्रमुख डॉ. धनंजय चौधरी, डॉ. बागुल तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तर वर्गांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.