करमाळा प्रतिनिधी:- आज करमाळा नगर परिषदेचे ध्वजारोहण नूतन नगराध्यक्ष मोहिनी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. न. प. प्राथ.शाळा नं-4 या शाळेने राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत, प्रतिज्ञा व भारतीय संविधानाचे गायन केले. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका टांगडे, शिक्षक मुसळे, अब्दुले गुरुजी, दुधे,माने व श्रीम. ताटे आदि शिक्षकांनी परिश्रम घेतले. याच शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी गायत्री शिंदे व तनया उबाळे यांनी भाषणे केली.देशभक्तीपर गीतावर नगरपालिकेतील सर्व शाळांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची सामुहिक कवायत सादर केली.पहाडी आवाजात ऑर्डर देण्याची काम व सामूहिक कवायतीचे नियोजन शिक्षक विक्रम राऊत व रमेश नामदे यांनी केले.शाळा क्र-4 च्या विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजाप्रमाणे वेष परिधान केला होता म्हणून मुले आकर्षक व ऍक्टिव्ह दिसत होती.नूतन उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिनजी तपसे व त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. प्रशासन अधिकारीअनिलजी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्र समन्वयक दयानंद चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर नियोजन करण्यात आले. सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.. 👍