कायदा सुव्यवस्थेला आवाहनआव्हान: अमलनेरात गुन्हेगारीचा उग्र चेहरा वर येऊ पाहतोय??

अपनी भाषा में पढ़े! Translate

कायदा सुव्यवस्थेला आवाहनआव्हान : अमलनेरात गुन्हेगारीचा उग्र चेहरा वर येऊ पाहतोय??

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात जुना वाद उकरून काढत सात जणांनी एकत्र येऊन एका तरुणावर लोखंडी रॉडने मध्यरात्री हल्ला करून मारहाण केल्याची खळबळजनक घटना दोन दिवसापूर्वी झामी चौक परिसरात घडली. या हल्ल्यात आरोपींनी पीडिताकडील मोबाईल, सोन्याची साखळी व रोख रक्कम असा एकूण सुमारे ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

फिर्यादीनुसार, कॅसर सैय्यद हा माझ्या घराजवळून दुचाकीवरून जात असताना जोरजोरात हॉर्न वाजवत होता याचा जाब बिचारला असता आरोपींनी त्याला अडवून वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून आरोपींच्या हातात लोखंडी रॉड व चाकू असल्याचे सांगण्यात येते. यावेळी शुभम च्या डोक्यावर रॉडने वार करण्यात आल्याने शुभम खाली पडला. त्यानंतर आरोपींनी कैसर आणि जाकीर यांनी त्याला बेदम मारले त्याच्या हातातील ब्रेसलेट हिसकावून घेत पायावर व शरीरावर मारहाण करत जबर लूट केली.

या प्रकरणी शुभम वाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कॅसर सैय्यद, जाकीर पठाण यांच्यासह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली असून घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात असून याच ठिकाणी अनधिकृत देशी मद्ये विकले जाते यावर देखील कठोर कारवाईची मागणी होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!