डी. आर. कन्या शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित डी. आर. कन्या शाळेत राष्ट्रमाता राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांची जयंती तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती (युवा दिवस) सकाळ व दुपार अशा दोन्ही विभागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सुर्यवंशी मॅडम तर उपमुख्याध्यापिका सौ. एस. पी. बाविकर मॅडम उपस्थित होत्या. यावेळी पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. डी. एन. पालवे, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी, सौ. आर. एस. सोनवणे मॅडम, श्री. एस. एस. वाघ आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर भाषणे, गीते व समूहगीतांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रीमती बी. एस. पाटील, सौ. पी. एस. सराफ, श्रीमती ममता महालपुरे यांनीही आपल्या भाषणातून माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थिनींसमोर उलगडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सौ. एस. एस. सुर्यवंशी मॅडम यांनी “माॅसाहेब जिजाऊ यांच्या संस्कारांमुळेच शिवबा घडला आणि इतिहास घडला. त्यांच्या कर्तृत्व, त्याग व कर्तव्यभावनेतून स्वराज्यनिर्माते घडले आणि त्यातूनच महाराष्ट्र घडला,” असे प्रेरणादायी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळ विभागासाठी सौ. एस. एस. देवरे मॅडम तर दुपार विभागासाठी सौ. पी. व्ही. साबे मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. आर. एस. सोनवणे मॅडम व सौ. वाय. एम. पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.