आनंदाचे स्वप्न अधुरेच; साखरपुड्यासाठी येणाऱ्या महाजन कुटुंबातील चौघांचा अमळनेर जवळ मृत्यू.

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260609-WA0465

आनंदाचे स्वप्न अधुरेच; साखरपुड्यासाठी येणाऱ्या महाजन कुटुंबातील चौघांचा अमळनेर जवळ मृत्यू.

 

अमळनेर : विक्की जाधव.

साखरपुड्याच्या आनंददायी सोहळ्यासाठी गुजरातमधून अमळनेरकडे निघालेल्या महाजन कुटुंबावर काळाने झडप घातली. अमळनेर-धुळे मार्गावरील मंगरूळ गावाजवळ सोमवारी (दि. ९) सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास कार, एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या दुर्घटनेत मोटरसायकलस्वारासह कारमधील एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एसटी चालक जखमी झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मोटरसायकल (एमएच १८ सी ८७१९) आणि एसटी बस (एमएच १३ सीयू ७५४०) अमळनेरकडून धुळ्याकडे जात होत्या. त्याचवेळी धुळ्याकडून येणारी गुजरात क्रमांकाची कार (जीजे १९ एएफ ३१४७) नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या वाहनांवर आदळली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की मोटरसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, तर कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात धरणगाव येथील मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. तसेच कारमधील आदित्य चंद्रकांत महाजन (जखमी असून) , अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन आणि सुरेश विक्रम महाजन (सर्व रा. व्यारा, गुजरात) यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून जखमी एसटी चालकावर उपचार सुरू आहेत. साखरपुड्यासारख्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबाचा प्रवास दुःखद अंताने संपल्याने अमळनेरसह गुजरातमधील व्यारा परिसरात शोककळा पसरली आहे. या भीषण अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!