करमाळा प्रतिनिधी :- करमाळा नगरपरिषदेचे सत्तांतर झाल्यानंतर करमाळा शहरातील भाजी विक्रेते, हातगाडी संघटना, टप्परी धारक संघटना यांनी आज वसुली धारकाच्या (टेकेदार) विरोधात एकवटलेलेदिसून आले. नुकताच सावंत गटाच्या नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांनी पदभार हाती घेतला असून नागरीकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असल्याने शहरातील सर्व भाजीविक्रेता, हातगाडी संघटना यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सावंत गटाचे नेते सुनील सावंत व नगरपरिषदेचे अधिकारी पालखे मॅडम, नगरसेवक पिल्लूभाऊ इंदलकर, अमोल परदेशी, विनोद महानवर यांना नियम बाहय पावती विरोधात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्या समोर अंदोलन करून निवेदन दिले आहे
सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करमाळा नगरपरिषदेने शहरातील फिरत्या व बैठक व्यवसाकांना जागेची आकारणी वरती नियमावली आकून पावती आकरण्यात आली आहे परंतू सदर ठेकेदार हा नियमाच्या बाहेर जाऊन सर्व विक्रेत्यांकडून दमदाठी व शिवीगाळ करून पाच पट वसूली करत असल्याने सर्व विक्रेत्यांकडून संताप व्यक्त होत होता. त्यामुळे आज सर्व विक्रेत्यांकडून संघटनांकडून अंदोलन करण्यात आले व सदर ठेकेदारा वरती योग्य कारवाई करून आम्हाला नियमित योग्य पावती आकरावी असे निवेदन दिले आहे.
सदर निवेदनावर सर्व संघटना धारक गणेश शिंदे, दत्तात्रय राऊत, पिंटू इंदलकर, अशोक हजारे, निलेश पवार,बबन वाघमारे,कयूम बागवान,अशिष राठोड, पिंटू राऊत , कमलेश इटुकली, आबा चिंचवड , सचिन चिंचवड, योगेश दळवी, महेश देशमाने, कमल विटकर,विजय गवळी, योगेश भुसारे, समीर शेख, अंकुश बरडे, सुरज राठोड, पिनू दळवी, आरबाज शेख,विलास जव्हेरी,शिवाजी मिसाळ,बाळू दळवी,सोमनाथ शिंदे,नंदा विटकर,सिमा विटकर,मगंल मेंढापुरे,हनुमंत दळवी आदी विक्रेत्यांच्या सह्या आहे