रेल्वे स्टेशन परिसर हिरवागार करण्याचा संकल्प; पर्यावरण दिनी वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260606-WA0607

रेल्वे स्टेशन परिसर हिरवागार करण्याचा संकल्प; पर्यावरण दिनी वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

 

अमळनेर : विक्की जाधव.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरात रोटरी क्लब अमळनेर, महिला हाऊसिंग ट्रस्ट आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.

IMG-20260606-WA0579

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने पूर्वतयारी करत खड्डे खोदणे, संरक्षक फेन्सिंग उभारणे आणि योग्य जागेची व्यवस्था केल्याने हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला. यावेळी रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

IMG-20260605-WA1301

महिला हाऊसिंग ट्रस्टच्या पर्यावरण सखींच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. गेल्या वर्षी शहरात सुमारे १२ हजार वृक्षांची लागवड व संगोपन यशस्वीरीत्या करणाऱ्या या महिलांनी यंदाही १२ ते १५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हरित अमळनेरच्या दिशेने सुरू झालेल्या या मोहिमेचा शुभारंभ रेल्वे स्टेशन परिसरातून करण्यात आला असून, पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. “एक वृक्ष – एक संकल्प, हरित भविष्य आपला संकल्प” हा संदेश देत हा उपक्रम पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!