अमळनेर नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम साजरे

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260606-WA0587

अमळनेर नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम साजरे

 

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रस्ट यांचा संयुक्त विद्या माने आज दिनांक 4 जून 2026 रोजी इंदिरा गांधी भवन येथे आज जागतिक पर्यावरण दिन निमित्त स्वच्छ भारत अभियान 2026 व माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत सीडबॉल बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाले. सदर कार्यशाळे दरम्यान जवळपास 1000 सीडबॉल बनविण्यात आले. तसेच दिनांक 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओंकार नगर येथे एक पेड मा के नाम अभियान अंतर्गत अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात करून हरित शपथ घेण्यात आली. तसेच उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक नगर परिषद अधिकारी कर्मचारी महिला हॉस्पिटलचे पदाधिकारी व नागरिक यांना घनकचरा अधिनियम 2026 अन्वये जारी करण्यात आलेल्या नियमाबद्दल माहिती देऊन अवगत* करण्यात आले तसेच त्यांना घनकचरा अधिनियम 2026 माहितीची प्रत देण्यात आली.

IMG-20260605-WA1301

तसेच स्वच्छता विभागामार्फत शहरातील 1 ते 18 प्रभाग मुकादम यांच्यासाठीही स्वच्छता विभाग कार्यालय येथे कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेदरम्यान सर्व प्रभाग मुकादम यांना घनकचरा अधिनियम २०२६ मधील विविध नियमानबद्दल माहिती देण्यात देवून हरित शपथ देण्यात आली. उपस्थित सर्व मुकादम यांना घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 माहितीची प्रत देण्यात आली.

IMG-20260606-WA0579

यावेळी अमळनेर नगर परिषद स्वच्छता विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक, स्वच्छता विभागातील कर्मचारी व तसेच महिला हाऊसिंग ट्रस्टचे सर्व महिला पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG-20260606-WA0558

यावेळी उपस्थित सर्वांना लोकनेते नगराध्यक्ष यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमाविषयी माहिती देऊन अवगत केले. तसेच नागरिकांना सदर अभियानात मोठ्या संख्येने आपले अमूल्य असे योगदान देण्याचे आवाहन करून अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व हरित बनवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!