शिवसंवाद दौऱ्याने अमळनेरात शिवसैनिकांमध्ये उत्साह; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज घेणार आढावा बैठक
अमळनेर : विक्की जाधव.
शिवसेना संसदीय गट नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आज, शनिवार दि. ६ जून रोजी अमळनेर विधानसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २.३० वाजता सुभाष चौक येथील हॉटेल मिडटाऊन येथे ही बैठक होणार असून, आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या बैठकीस शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, व्यापारी सेना, शेतकरी सेना तसेच शिवसेनेच्या सर्व अधिकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटनात्मक बळकटीकरणावर भर दिला जाणार असल्याने अमळनेरातील शिवसैनिकांमध्ये या बैठकीबाबत विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.