“एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना मोठी भेट; आगारातील शौचालये झाली मोफत”

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260606-WA0549

“एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना मोठी भेट; आगारातील शौचालये झाली मोफत”

अमळनेर : विक्की जाधव.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एसटी आगार आणि बसस्थानकांवरील शौचालय वापरासाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करण्यात आले असून याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना कोणतेही शुल्क न भरता स्वच्छतागृह सुविधा वापरता येणार आहे.

IMG-20260605-WA1301

एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी एसटीच्या सेवांचा लाभ घेत असताना बसस्थानकांवरील मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात असल्याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त होत होती. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही बाब गैरसोयीची ठरत होती. प्रवाशांच्या या भावना लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने वर्धापन दिनाचे औचित्य साधत हा लोकाभिमुख निर्णय घेतला आहे.

IMG-20260606-WA0558

          नगरसेवक : गुलाब काशिनाथ पाटील 
एसटीच्या ७८ वर्षांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने प्रवाशांना दिलेली ही एक प्रकारची भेट मानली जात आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असून बसस्थानकांवरील सुविधा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनतील. राज्यभरातील प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून एसटी प्रशासनाने आता स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता व देखभाल राखण्यावरही भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!