राज्यातील सर्व क्रीडांगणांवर महिला खेळाडूंसाठी मूलभूत सुविधा अनिवार्य; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-05 at 1.55.12 PM

राज्यातील सर्व क्रीडांगणांवर महिला खेळाडूंसाठी मूलभूत सुविधा अनिवार्य; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

WhatsApp Image 2026-06-05 at 1.55.12 PM (1)
WhatsApp Image 2026-06-05 at 1.55.12 PM (1)

 

मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

राज्यातील महिला खेळाडूंना सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व क्रीडांगणांवर स्वच्छतागृहे, स्वतंत्र चेंजिंग रूम, पुरेशी प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

महिला खेळाडूंसाठी क्रीडांगणांवर स्वच्छतागृहांच्या सुविधांबाबत विधानमंडळात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मिलिंद नार्वेकर, चित्रा वाघ तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्रातील महिला खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांच्या प्रगतीसाठी सुरक्षित आणि सक्षम वातावरणासोबतच दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. महिला खेळाडूंना आवश्यक मूलभूत सुविधा मिळाल्यास त्यांच्या सहभागात आणि कामगिरीत निश्चितच वाढ होईल.

राज्य शासनाने नव्या क्रीडा धोरणाद्वारे खेळाडूकेंद्रित दृष्टिकोन स्वीकारला असून ग्रामीण भागापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रशिक्षण, पोषण, आर्थिक पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि सुरक्षित वातावरण या बाबींना विशेष महत्त्व देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील सर्व क्रीडांगणांवर महिला खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून कृती आराखडा तयार करावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

बैठकीत राज्यातील क्रीडांगणांवरील महिला खेळाडूंसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!