भिगवण स्मशानभुमी रस्त्यावर वृक्षारोपन;परागभाऊ जाधव युवक फाउंडेशन चा उपक्रम
(निलेश गायकवाड)
येथील परागभाऊ जाधव युवक फाऊंडेशन वतीने येथील श्रीनाथ चौक ते भिगवण स्मशानभुमी रस्त्यावर ४६ वृक्षाचे रोपन करण्यात आले. देशी वृक्षांचे रोपन करत देशी वृक्षांच्या लगावडीस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला. फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे स्वागत होत होत.
वाढत चाललेल्या तापमानावर नियंत्रण मिळावे व पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या हेतुन येथील परागभाऊ जाधव युवक फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी सरपंच पराग जाधव, गुराप्पा पवार, तानाजी वायसे, उपसरपंच कपिल भाकरे, सत्यवान भोसले, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख देवानंद शेलार, श्रीनाथ विका सोसायटीचे माजी अध्यक्ष खंडेराव गाडे, भाऊसाहेब भरणे, आदीसह युवक फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी श्रीनाथ चौक ते स्मशानभुमीपर्यंत ४६ करंज वृक्षाचे रोपन करण्यात आले. देशी वाणांची लागवड करत देशी वाणांच्या सवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन परागभाऊ जाधव युवक फाऊंडेशनचे योगेश जाधव, सनी जाधव, अवित पवार, रितेश जाधव, साजिद मुलानी, अनिकेत जमदाडे आदींनी केले.