करमाळ्याच्या मोहरम उत्सवाची लगबग सुरू – उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अल्ताफशेठ तांबोळी यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG_6129

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा शहरातील मोहरम उत्सवाच्या तयारीला आता जोरदार सुरुवात झाली आहे. यंदाचा मोहरम उत्सव अधिक उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यासाठी मोहरम उत्सव समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांची अध्यक्षपदी, तर पैलवान सोहेल पठाण यांची मिरवणूक प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नालबंद मंगल कार्यालय येथे माजी नगराध्यक्ष शौकतभाई नालबंद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हिंदू-मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती.
करमाळ्याचा मोहरम केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो सामाजिक सलोख्याचा एक मोठा सोहळा आहे. या उत्सवात मुस्लिम बांधवांसोबतच हिंदू समाजही तितक्याच उत्साहाने सहभागी होतो. विशेष म्हणजे, रजपूत समाजाची ‘सुतार तालीम सवारी’, लिंगायत समाजाची ‘माहुले यांची सवारी’, ‘चिवटे यांचा डोला’, कुंभार समाजाची सवारी आणि रंभापूर येथील ‘दुधाट यांची सवारी’ यांसारख्या विविध सवाऱ्यांचा सहभाग या उत्सवाला विशेष धार्मिक आणि सामाजिक उंची प्राप्त करून देतो.
बैठकीत यंदाचा उत्सव कायद्याचे पालन करत आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस अमीरशेठ तांबोळी, जाकीर वस्ताद, जाफर घोडके, पैलवान इमरान वस्ताद, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, पत्रकार राजू सय्यद, इस्माईल सय्यद, पैलवान सलमान घोडके, सारंग परदेशी, पप्पू सय्यद, अमर शेख, बिलाल कुरेशी यांच्यासह सुफरान शेख, भैय्या परदेशी, केतन परदेशी व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

अनेक वर्षांपासून दोन्ही समाजातील बांधव खांद्याला खांदा लावून हा उत्सव साजरा करतात. मानाची नाल साहेबांची सवारी पाहण्यासाठी हिंदू बांधवांची मोठी गर्दी असते. यंदाचा उत्सवही शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा केला जाईल.”
– शौकतभाई नालबंद, माजी नगराध्यक्ष

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!