लायन्स क्लबतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त ‘हंगर विक’ अंतर्गत अन्नदान उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

लायन्स क्लबतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त ‘हंगर विक’ अंतर्गत अन्नदान उपक्रम

 

अमळनेर : विक्की जाधव.

समाजातील गरजू नागरिकांपर्यंत सकस अन्न पोहोचावे व कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये या सेवाभावी उद्देशाने लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदावाडी येथे अन्नदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “हंगर विक प्रोजेक्ट” अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात गोड पुरणपोळी, आमटी-भात, गोडशिरा, कुरडई, पापड आदी पारंपरिक व पौष्टिक जेवणाचे वितरण करण्यात आले. सकाळी ११.४५ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमासाठी लायन्स क्लबच्या स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध तयारी करत गरजू कुटुंबांना अन्नदान केले. हा उपक्रम यापुढे महिन्यातील दर सोमवारी राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या उपक्रमाच्या वेळी काठेयावाडी जैन संघाचे अध्यक्ष नितीनकुमार शहा, गिरीष शहा, राजू देसाई, लायन्स डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर आदी उपस्थित होते. या सेवाभावी उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून भविष्यातही अन्न, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!