‘प्रताप’ मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न..
अमळनेर: विक्की जाधव.
प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजमाता जिजामाता शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांची ४२८ वी जयंती तसेच नरेंद्रनाथ दत्त उर्फ अध्यात्मिक गुरू व तत्त्वचिंतक स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास पराग पाटील, अतुल धनगर, विशाल अहिरे, आकाश कोळी, मोहित पाटील, विशाल पाटील, मनीष राजपूत, कुणाल पाटील, नंदूसिंग पाटील, दिलीप शिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी प्र. प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव तसेच करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊंचे संस्कार व स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.