न. पा कडून अमळनेर बस स्टँड परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अमळनेर : विक्की जाधव.
शहराला “स्वच्छ शहर सुंदर शहर” या संकल्पनेतून अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्याच्या उद्देशाने अमळनेर नगर परिषदेच्या वतीने शहरातील बस स्टँड परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम अमळनेर नगर परिषदेचे नगर अध्यक्ष व उप नगरअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगर परिषदेतील सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे पार पडली.
या मोहिमेत संबंधित प्रभागातील मुकादम, स्वच्छता कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या समन्वयातून बस स्टँड परिसरातील कचरा संकलन, स्वच्छता व परिसर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे परिसर स्वच्छ व नागरिकांसाठी अधिक आरोग्यदायी बनविण्यात आला. सदर स्वच्छता मोहीम अमळनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या आदेशान्वये राबविण्यात आली. प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून अमळनेर शहर स्वच्छतेच्या दिशेने पुढे जात असल्याचे या मोहिमेतून दिसून आले.