कायदेशीर लढाईला यश; चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता अँड नंदलाल सूर्यवंशी यांचा प्रभावी युक्तिवाद 

अपनी भाषा में पढ़े! Translate

कायदेशीर लढाईला यश; चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता अँड. नंदलाल सूर्यवंशी यांचा प्रभावी युक्तिवाद 

 

अमळनेर : विक्की जाधव.

सन २०१३ पासून अमळनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित असलेल्या बहुचर्चित धनादेश अनादर प्रकरणात अखेर न्याय मिळाला असून, न्यायालयाने आरोपी सुधाकर कोळी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. आशापुरी नागरी पतसंस्थेने २ लाख ५६ हजार रुपयांच्या धनादेश अनादराचा आरोप करत भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ अंतर्गत खाजगी फिर्याद दाखल केली होती. तब्बल दशकभर चाललेल्या या खटल्याचा निकाल आता आरोपीच्या बाजूने लागल्याने कायदेशीर वर्तुळात याची विशेष दखल घेतली जात आहे.

या प्रकरणात आरोपीच्या वतीने अँड. नंदलाल सूर्यवंशी यांनी प्रभावी व अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला. फिर्यादी पक्षाच्या आरोपांतील विसंगती, कायदेशीर त्रुटी आणि सादर पुराव्यांची बारकाईने छाननी करत त्यांनी न्यायालयासमोर ठोस बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा सखोल युक्तिवाद ऐकून व उपलब्ध पुरावे तपासून, न्यायालयाने फिर्यादीचे आरोप सिद्ध न झाल्याचे नमूद करत आरोपी सुधाकर कोळी यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली.या यशस्वी निकालामागे अॅड. सूर्यवंशी यांना त्यांचे काका श्री. मुंडके यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच अॅड. व्ही.एन. चौधरी व अॅड. संभाजी पाटील यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. या निर्णयामुळे आरोपीला मोठा दिलासा मिळाला असून, कायदे क्षेत्रात अॅड. नंदलाल सूर्यवंशी यांच्या कामगिरीचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!