सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाच्या राज्याध्यक्षपदी संजय पाटील 

अपनी भाषा में पढ़े! Translate

सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाच्या राज्याध्यक्षपदी संजय कृष्णा पाटील यांची नियुक्ती. 

 

अमळनेर : विक्की जाधव.

खान्देश साहित्य संघ संचलित सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी संजय कृष्णा पाटील यांची निवड करण्यात आली. खान्देश साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी यांनी ही निवड जाहीर केली आहे.

       खान्देश साहित्य संघाची बैठक अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या गांधी अध्ययन मध्ये प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्ष रत्नाताई पाटील , जिल्हाध्यक्ष शरद धनगर , शाहीर नाना पाटील ,मराठी विभाग प्रमुख प्रा ज्ञानेश्वर कांबळे ,साहित्यिक गोकुळ बागुल ,तालुकाध्यक्ष उमेश काटे हजर होते. खान्देशी साहित्य चळवळ मजबूत करण्यासाठी संघाच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. यात प्रामुख्याने खान्देश साहित्य संघाचे जिल्हा कार्यवाह म्हणून गोकुळ बागुल, कवयित्री बहिणाबाई साहित्य संघाच्या राज्य संघटन प्रमुख म्हणून छाया इसे, जळगाव जिल्हा संघटक डॉ सुवर्णा पाटील , रेखा मराठे जिल्हा संपर्क प्रमुख , सीमा संदेश पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य , नूतन हिम्मत पाटील तालुका कार्यवाह , मुख्याध्यापिका अनिता बोरसे तालुका मार्गदर्शक ,ज्ञानेश्री पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य , अशोक पाटील ,तालुका कार्यवाह मनोज ठाकरे ,विलास बिरारी अमळनेर तालुका सदस्य ,भाऊसाहेब देशमुख मार्गदर्शक याना नियुक्तीपत्र देण्यात आले.खान्देशात पुढील साहित्य संमेलन , मराठी आणि अहिराणी भाषा यांचे महत्व वाढवण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रम राबवणे याविषयावर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन उमेश काटे ,गोपाल हडपे आणि आभार डी ए धनगर यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!