कर्मयोगीने दिला प्रशांतच्या व्यवसायाला हातगाडीचा आधार…
जुनीवस्ती बुटीबोरी येथे कुंभारपुऱ्यात राहणारा प्रशांत ठाकरे हा तरुण सातत्याने घरातील गरीब परिस्थितीशी संघर्ष करून जीवन जगत आहे. प्रशांत हा घरातील ज्येष्ठ मुलगा, त्याला समजायला लागले तेव्हा त्याला समजले की वडील हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची, त्यात पुढे हा परिवार मोठा झाला तीन भाऊ व एक बहीण त्यामुळे पुढे अतिशय लहानपणातच आईसोबत प्रशांत कामाला लागला सोबतचं त्याने विज्ञान शाखेतील पहिल्या वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला परंतु परिस्थितीपुढे हतबल होऊन त्याला शिक्षण सोडावे लागले.
प्रशांतने पूर्णपणे स्वतःला कामात झोकून दिले ठेकेदारीत स्ट्रेट बँकेत व इतर ठिकाणी काम करून त्याने आपल्या बहिणीचे व दोन भावांचे, शिक्षण, लग्न व स्वतःचेही लग्न केले, कालांतराने वडील सुद्धा स्वर्गवासी झाले, सर्व भाऊ आता वेगवेगळे राहतात, प्रशांत आपल्या आईला घेऊन राहतो. आई, त्याचे तीन मूलं, पती, पत्नी असा परिवार या सर्वांची जबाबदारी प्रशांतवर असल्यामुळे प्रशांतने आपला पिढीजात कुंभार व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.
प्रशांतने मडके गुलर, व इतर साहित्य खरेदी करून विकायला सुरवात केली. पण या वस्तू विकण्यासाठी तो भाड्याने हातगाडी करून विकायला लागला. त्याच्या रोजच्या अल्पशा मिळकतील काही भाग हा हातगाडीला जाऊ लागला. आपली स्वतःची हातगाडी असावी या विचाराने तो कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्याकडे गेला. त्यांनी त्याची सर्व आपबिती आयकून घेतली. त्याचा स्वाभिमान व स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रामाणिक जिद्द पाहून पंकज ठाकरे यांनी स्वतः त्याच्यासोबत नागपूरला जाऊन हातगाडी घेऊन दिली.
यावेळी पंकज ठाकरे म्हणाले प्रशांत सारखे तरुण गरजवंत व्यवसाय करणारी मुलं जर कोणाला दिसली तर त्यांच्या व्यवसायाला थोडाफार तरी हातभार लावून मानवता जपावी असे पंकज ठाकरे यावेळी आवर्जून म्हणाले..