गुरुकुल विद्यामंदिर गोखळी विद्यालयातील शिक्षक श्री. दिपक वडापुरे सर यांचा पुणे शिक्षक विभाग मतदार संघाचे मा.आमदार श्री.दत्तात्रय सावंत सर,मा.श्री कैलास जाधव(रा.अनु.स.सदस्य केंद्रीय हिंदी निदेशालय भारत सरकार नई दिल्ली), यांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित
(समीर बळे प्रतिनिधी)
दिः १० महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ संलग्न, इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघ इंदापूर हिंदी निबंध /वक्तृत्व प्रतियोगिता / पुरस्कार समारोह उपक्रमशील अध्यापक आदर्श हिंदी अध्यापक / विद्यार्थी /सेवानिवृत्त हिंदी अध्यापक गुणगौरव
पुरस्कार समारंभ सोहळा केतकेश्वर सांस्कृतिक भवन निमगाव येथे संपन्न झाला.
मा. श्री दत्तात्रय सावंत सर (मा. आमदार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षक २०२६ गुरुकुल विद्यामंदिर गोखळी विद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख, हिंदी अध्यापक संघ संचालक, उपाध्यक्ष- पुणे जिल्हा एकनाथ शिंदे शिक्षक संघटना, उपाध्यक्ष- शाळा व्यवस्थापन समिती,हिंदी व भूगोल विषयाचे प्रभावी अध्यापन करणारे तज्ञ शिक्षक श्री.दिपक जगन्नाथ वडापुरे सर यांचा उपक्रमशील शिक्षक म्हणून यांचा केतकेश्वर सांस्कृतिक भवन निमगांव केतकी येथे पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुरुकुल विद्यामंदिर गोखळी विद्यालयातील निबंध स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थी-साक्षी नाना टेळे, श्रावस्ती उदय माने,धनश्री नानासो मदने, सृष्टी दत्तात्रय बनकर ,नंदिनी भाऊ मिंड,स्वराली संजय व्यवहारे, आरोही सचिन भोंग,संस्कृती तानाजी मदने,पृथ्वीराज उदयसिंह भोसले या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी मा.श्री. दत्तात्रय सावंत (आमदार- पुणे विभाग शिक्षक मतदार संघ), मा.श्री कैलास जाधव सर(रा.अनु.स.सदस्य केंद्रीय हिंदी निदेशालय भारत सरकार नई दिल्ली), मा.श्री. पाटील जे.एन. (अध्यक्ष-मुख्याध्यापक संघ इंदापूर), , मा. श्री. उस्मान मुलाणी (सदस्य-महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ) मा. श्री. राजेंद्र रणमोडे (उपाध्यक्ष, पुणे हिंदी अध्यापक संघ), मा. श्री. सुधाकर भोंग (पुणे जिल्हा समन्वयक, श्री भोंग के.डी. ( अध्यक्ष-हिंदी अध्यापक संघ इंदापूर) उपाध्यक्ष- श्री. डी.जे निंबाळकर सचिव- संजीवकुमार पांढरे,कार्याध्यक्ष – श्री. डी. व्ही. वाघ श्रीमती . भोसले मनिषा ( मुख्य सल्लागार ), .सल्लागार –
श्री. सी.एस. सोळसे (मुख्याध्यापक नंदिकेश्वर विद्यालय )
श्री. आर. आर. मचाले सर(प्राचार्य- श्री. छत्रपती ज्युनि. कॉलेज)
श्री. गवळी .डी .के .प्रसिद्धी प्रमुख , अध्यक्ष- पुणे जिल्हा एकनाथ शिंदे शिक्षक संघटना ) मुख्याध्यापक संघ, विषय शिक्षक संघटना, संघटनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष -श्री. लक्ष्मण हरणावळ (गुरूजी) उपाध्यक्ष- श्री.भरत हरणावळ सर, मुख्याध्यापक- श्री .विश्वास हुलगे सर , सौ .अश्विनी हरणावळ मॅडम, आदि सर्व मान्यवरांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.