भिगवन शेटफळ गटातील इच्छुकांची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे;जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवन शेटफळ गटातील इच्छुकांची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे;जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम

(निलेश गायकवाड)

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा आज-उद्या होईल. राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर न झाल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रचारात उतरलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांनी अनेक महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली होती.

गावोगावी संपर्क दौरे, बैठका, तसेच संभाव्य वार्डातील तसेच गटातील मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येतं आहे . काही इच्छुकांनी, तर आर्थिक खर्चालाही सुरुवात केली असून, प्रचार साहित्य, वाहन व्यवस्था, कार्यकर्त्यांचे नियोजन यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. आता फक्त निवडणुकीची तारीख जाहीर होण्यासाठी इच्छुक आत्तूरतेने वाट बघताना दिसत आहे. भिगवन शेटफळ गटामध्ये इच्छुकांनी खूप मोठ्या जोमात आणि उत्साहात निवडणुकीसाठी सज्जक अशी तयारी केली आहे

राज्यात सध्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामधील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपून दीर्घ काळ लोटला असून, प्रशासकीय राजवटीतून कारभार सुरू आहे. यामुळे नागरिकांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.

भिगवन शेटफळ गटातील इच्छुक उमेदवारांनी पायाला भिंगरी लावत निवडणूक आयोगाने अधिकृत रित्या निवडणूक जाहीर केली जरी नसेल पण तरी इच्छुक उमेदवारांनी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात सर्व इच्छुक उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच तारेवरची कसरत पाहायला मिळणार आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!